मोर कुक्कुटवर्गीय पक्षी आहे. या आकर्षक रंगाच्या सुंदर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. विणीच्या हंगामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच तो झडून जातो. जंगलात वावरणाऱ्यांना ही पिसाऱ्याची पिसे सापडू शकतात. मोराचा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो. त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबसचक पिसारा असणारे मोराचा नाच हा प्रेशणीय असतो. गोव्यात मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात.
मोराचे एकूण मुख्य तीन प्रकार आढळतात; दोन आशियाई प्रजाती, भारतीय उपखंडातील भारतीय मोर आणि दक्षिणपूर्व आशियातील हिरवा मोर; तसेच आफ्रिकेच्या काँगो खोऱ्यातील आफ्रिकन मोर.
मोर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.