काळा करकोचा हा पक्षी साधारण १०० सें. मी आकारमानाचा आहे. याचा मुख्य रंग काळा असून छातीच्या खालच्या भागापासून शेपटीच्या टोकापर्यंतचा भाग पांढरा, चोच तांबड्या रंगाची, लांब आणि अणकुचीदार तर पायही तांबड्या रंगाचे असतात.
हा करकोचा उत्तर भारतात तसेच पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार येथे युरोपमधून हिवाळी पाहुणा म्हणून येतो.
काळा करकोचा जलचर पक्षी असून तो मांसभक्षी आहे. मासोळ्या, बेडूक, कीटक, इतर पक्ष्यांची पिल्ले, उंदीर, सरडे, गोगलगायी हे याचे मुख्य अन्न आहे.
मध्य युरोपमध्ये एप्रिल-मे महिन्यात याची वीण होते. याचे घरटे उंच झाडावर, काटक्यांचे बनविलेले असते. मादी एकावेळी ३ ते ५ शुभ्र पांढऱ्या रंगाची अंडी देते.
काळा करकोचा
या विषयातील रहस्ये उलगडा.