सागरिका घोष

या विषयावर तज्ञ बना.

सागरिका घोष

सागरिका घोष (जन्म: ८ नोव्हेंबर १९६४) या एक भारतीय पत्रकार, स्तंभलेखक आणि लेखिका आहेत. १९९१ पासून त्या पत्रकार आहेत आणि टाइम्स ऑफ इंडिया, आउटलुक आणि द इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांनी काम केले आहे. बीबीसी वर्ल्डसाठी क्वेशन टाइम इंटरनेट या कार्यक्रमात त्या प्राइम टाइम अँकर होत्या, तसेच सीएनएन आयबीएनच्या त्या उपसंपादक देखील होत्या.

घोष यांना पत्रकारितेत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्या दोन कादंबऱ्यांच्या लेखिकाआहेत. इंदिरा गांधी यांचे चरित्र, "इंदिरा: भारताचे सर्वात शक्तिशाली पंतप्रधान" हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. सध्या त्या द टाइम्स ऑफ इंडियाच्या सल्लागार संपादिका आहेत. २०२२ मध्ये भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे त्यांनी लिहलेले चरित्र प्रसिद्ध झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →