बरखा दत्त

या विषयावर तज्ञ बना.

बरखा दत्त

बरखा दत्त या एक भारतीय दूरचित्रवाणी पत्रकार आणि लेखिका आहेत. त्या मोजो स्टोरी या यूट्यूब न्यूझ चॅनेलच्या मालकीणही आहेत.

त्या द हिंदुस्तान टाईम्स आणि द वॉशिंग्टन पोस्टच्या एक स्तंभलेखिका आहेत. दत्त या २१ वर्षे एनडीटीव्हीच्या पत्रकार होत्या. जानेवारी २०१७ मध्ये त्यांनी चॅनल सोडले. १९९९ च्या भारत-पाकिस्तान कारगिल युद्धातील पत्रकारितेनंतर त्या एक प्रमुख पत्रकार म्हणून उदयास आल्या. एनडीटीव्हीवर दत्त साप्ताहिक पुरस्कार-विजेता कार्यक्रम "वी द पीपल", तसेच दैनिक प्राइम-टाइम शो 'द बक स्टॉप्स हिअर"च्या सूत्रसंचालिका होत्या.

बरखा दत्त यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. यामध्ये पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मानचाही समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →