विजयालक्ष्मी पंडित (पूर्वाश्रमीच्या नेहरू) (जन्म : अलाहाबाद, १८ ऑगस्ट १९००; - देहरादून, १ डिसेंबर १९९०) या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या. त्या महाराष्ट्राच्या ६ व्या राज्यपाल होत्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ८ व्या अध्यक्षा होत्या. या दोन्ही पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. त्या भारतातील नेहरू-गांधी या प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील सदस्य होत्या. त्यांचे भाऊ जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यांची भाची इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांचे नातू राजीव गांधी हे भारताचे सहावे पंतप्रधान होते.
सोव्हिएत युनियन, युनायटेड स्टेट्स आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये नेहरूंचे दूत म्हणून काम केल्यानंतर पंडित यांना भारताचे सर्वात महत्त्वाच्या मुत्सद्दी म्हणून लंडनला पाठवण्यात आले. तसेच भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या १५ महिलांमध्ये त्या एक होत्या.
विजयालक्ष्मी पंडित
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?