सॅक्रामेंटो ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याची राजधानी आहे. हे शहर कॅलिफोर्निया खोऱ्याच्या उत्तर
अमेरिकन नदी आणि सॅक्रामेंटो नदीच्या संगमावर वसले असून ते सॅन फ्रॅन्सिस्कोच्या ९० मैल ईशान्येस स्थित आहे. आहे. २०१० साली ४,६६,४८८ इतकी लोकसंख्या असलेले सॅक्रामेंटो कॅलिफोर्नियामधील सहाव्या तर अमेरिकेमधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
कॅलिफोर्निया गोल्ड रशदरम्यान वसवले गेलेले सॅक्रामेंटो सोने वाहतूकीचे प्रमुख केंद्र म्हणून झपाट्याने वाढले. इ,स. १८५४ साली कॅलिफोर्नियाची राजधानी सॅक्रामेंटो येथे हलवण्यात आली. सध्या सॅक्रामेंटो कॅलिफोर्नियामधील एक प्रमुख शहर आहे.
साक्रामेंटो (कॅलिफोर्निया)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.