साओ लुइस (पोर्तुगीज: São Luís) ही ब्राझिल देशाच्या मरान्याव राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. साओ लुईस शहर ब्राझिलच्या उत्तर भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१४ साली साओ लुइसची लोकसंख्या १२.२७ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार साओ लुइस ब्राझिलमधील १६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १९९७ साली येथील ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी साओ लुईसला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत समाविष्ट केले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साओ लुइस
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.