सांचिन संस्थान

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सांचिन (इ.स.१७९१ ते इ.स. १९४७) हे जंजिऱ्याच्या सिद्दीच्या वंशजांनी, तत्कालीन पेशव्यांशी (सवाई माधवराव पेशवे? ) तह करून गुजराथेत सुरतेजवळ सांचिन येथे स्थापन केलेले संस्थान होते. जंजिऱ्याचे सिद्दी हे अहमदनगर आणि विजापूर येथील राजाजवळ आरमाराच्या नोकरीत होते. हीच नोकरी त्यांनी मोंगलांच्या वेळीही केली. मोंगलांच्या ऱ्हासानंतर ते जंजिऱ्यास राहूं लागले. या सिद्दींनी मराठे व इंग्रज ह्यांच्याबरोबर अनेक उलाढाली केल्या.

जंजिऱ्याचा नवाब सिद्दी अब्दुल रहमान याचा मुलगा सिद्दी अब्दुल करीम हा सिद्दी जोहर याच्या बंडाळीमुळे/आक्रमणामुळे १७८४ मध्ये पळून पुण्याला पेशव्यांच्या आश्रयाला आला. त्याने १७९१ च्या पेशव्यांसोबतच्या तहात जंजिऱ्याचे अधिकार (केवळ कागदोपत्री ?) सोडून त्या एवजी सांचिनची जहागिरी मिळवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →