सरला देवी चौधरी (जन्म: सरला घोषाल; ९ सप्टेंबर १८७२ - १८ ऑगस्ट १९४५) या भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि राजकीय कार्यकर्त्या होत्या. त्यांनी १९१० मध्ये अलाहाबाद येथे भारत स्त्री महामंडळाची स्थापना केली. ही भारतातील राष्ट्रीय स्तरावरील पहिली महिला संघटना होती. संस्थेच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे स्त्री शिक्षणाचा प्रसार करणे. संपूर्ण भारतातील महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी या संस्थेने लाहोर (तेव्हा अविभाजित भारताचा भाग), अलाहाबाद, दिल्ली, कराची, अमृतसर, हैदराबाद, कानपूर, बांकुरा, हजारीबाग, मिदनापूर आणि कोलकाता येथे अनेक कार्यालये उघडली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सरला देवी चौधरानी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.