अरविंद घोषांचे साहित्य

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अरविंद घोषांचे साहित्य

अरविंद घोष (श्रीअरविंद) हे उच्च विद्याविभूषित होते, बहुभाषाविद होते. महाकवी होते, लेखक होते, अनुवादक होते, संपादक होते. त्यांनी विपुल लेखन केले आहे.





(एस.ए.बी.सी.एल.) - इ.स. १९७२ मध्ये श्रीअरविंद यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्यात आले. श्रीअरविंद आश्रमातर्फे Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL), श्रीऑरोबिंदो बर्थ सेन्टेनरी लायब्ररी या नावाने एकूण ३० खंड प्रकाशित करण्यात आले होते.

(सी.डब्ल्यू.एस.ए.) - इ.स. १९९७ साली, त्यांच्या १२५ व्या जन्मवर्षानिमित्ताने, पुन्हा एकदा उर्वरित अप्रकाशित साहित्याचा समावेश करत सुधारित समग्र साहित्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. आजवर त्यामधील ३६ खंडांचे प्रकाशन झाले आहे. ते खंड Complete Works of Sri Aurobindo (CWSA). कम्प्लीट वर्क्स ऑफ श्रीऑरोबिंदो या नावाने प्रकाशित करण्यात आले.आधीच्या ३० खंडामधील साहित्याव्यतिरिक्त आणखी सुमारे ३००० पानांची भर या खंडांमध्ये घालण्यात आली आहे. यामधील प्रत्येक खंड सुमारे ५०० पानांचा आहे. यावरून श्रीअरविंद यांच्या बहुप्रसवा लेखणीची कल्पना येईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →