ज्ञानदानंदिनी टागोर (पुर्वाश्रमीच्या मुखोपाध्याय; २६ जुलै १८५० - १ ऑक्टोबर १९४१) ह्या एक समाजसुधारक होत्या ज्यांनी विविध सांस्कृतिक नवोपक्रमांचा पाया रचला. त्यांनी १९ व्या शतकातील बंगालमध्ये स्त्री सक्षमीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर प्रभाव पाडला. त्यांचा विवाह रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ आणि जोरासांको टागोर कुटुंबातील वंशज सत्येंद्रनाथ टागोर यांच्याशी झाला होता.त्या आज पारंपारिक बंगाली शैलीवर आधारित साडीची एक अनोखी शैली, ब्राह्मिका साडी विकसित करण्यासाठी ओळखल्या जातात. ह्यामध्ये त्यांनी मुंबईत राहताना गुजराती आणि पारशी शैलीतील घटक वापरले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ज्ञानदानंदिनी देवी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?