समलैंगिकद्वेष म्हणजे समलैंगिक (किंवा सार्वलैंगिक आणि उभयलैंगिक) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंवा समजल्या जाणाऱ्या लोकांबद्दल अनेक नकारात्मक दृष्टिकोन आणि भावना आणि या व्यक्तींबद्दल वाटणारा द्वेष. समलैंगिकद्वेषाची व्याख्या तिरस्कार, पूर्वग्रह, तिटकारा, द्वेष किंवा वैरभाव अशी केली गेली आहे. या भावना अतार्किक भीतीवर आधारित आणि कधीकधी धार्मिक श्रद्धांशी संबंधित असू शकतात. विषमलैंगिक नासलेल्या लैंगिक कलांच्या आधारावर भेदभाव आणि हिंसाचार यासारख्या गंभीर आणि प्रतिकूल वर्तनात समलैंगिकद्वेष दिसून येतो.
समलैंगिक द्वेषाच्या ओळखल्या जाणाऱ्या प्रकारांमध्ये संस्थात्मक समलैंगिक द्वेष (उदा. धार्मिक समलैंगिक द्वेष आणि राज्य-प्रायोजित समलैंगिक द्वेष) आणि आंतरिक समलैंगिक द्वेष (जो समलैंगिक आकर्षण असलेल्या लोकं स्वतःबद्दल अनुभवतात). एफबीआय नॅशनल प्रेस ऑफिसने जारी केलेल्या २०१० च्या द्वेष गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये १९.३ टक्के द्वेष गुन्हे "लैंगिक कलाबद्दल पूर्वाग्रहाने प्रेरित होते." या शिवाय, १९९५ ते २००८ पर्यंतच्या एफबीआयच्या राष्ट्रीय द्वेष गुन्ह्यांच्या आकडेवारीचा सारांश देणाऱ्या सदर्न पॉव्हर्टी लॉ सेंटर २०१० इंटेलिजेंस रिपोर्टमध्ये असे आढळून आले की एलजीबीटीक्यू लोक "हिंसक द्वेष गुन्ह्यांचा बळी पडण्याची शक्यता अमेरिकेतील इतर कोणत्याही अल्पसंख्याक गटापेक्षा खूपच जास्त होती."
समलैंगिकद्वेष
थोडक्यात पण महत्त्वाचे.