लिंगभाव द्विवर्णक

या विषयावर तज्ञ बना.

लिंगभाव द्विवर्णक (द्विवर्णकवाद किंवा अस्पष्टपणे लिंगवाद असेही म्हणले जाते) हे सामाजिक प्रणाली किंवा सांस्कृतिक श्रद्धेनुसार लिंगाचे पुरुषत्व आणि स्त्रीत्व या दोन भिन्न स्वरूपात वर्गीकरण आहे.

या द्विवर्णक मानकात, लिंग, लिंगभाव आणि लैंगिकता संरेखित करण्यासाठी माणसाच्या जन्मजात लैंगिक बाबी त्याच्या अनुवांशिक किंवा युग्मक- आधारित लिंगाशी किंवा जन्मापासून नियुक्त केलेल्या एखाद्या लिंगाशी अंतर्भूतपणे जोडलेल्या असतात. असे गृहीत धरले जाऊ शकते. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा पुरुष जन्माला येतो, तेव्हा लिंग द्विवर्णक मानकाप्रमाणे असे मानता येते की पौरुषयुक्त देखावा, चरित्र आणि वर्तन आणि यामध्ये स्त्रीलिंगी आकर्षण असणे हे या पुरुषाचे वैशिष्ट्य असेल. या पैलूंमध्ये वर्तन, लैंगिक आवड,नावे किंवा सर्वनामे यांचा समावेश होतो. या अपेक्षांमुळे द्विवर्णक लोकांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन, पक्षपातीपणा आणि भेदभाव यांना जागा मिळते. ही माणसे लिंगभिन्नता किंवा अनभिसंगतीची अभिव्यक्ती दर्शवितात किंवा त्यांची लिंग ओळख त्यांच्या जन्माशी एकरूप नसते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →