सनगर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सनगर ही एक मागासवर्गीय जात आहे. या जातीचे लोक महाराष्ट्र राज्यात राहतात. अत्यंत अल्प लोकसंख्या असलेला समाज. ही धनगर समाजाची एक पोट शाखा आहे. परंतु धनगर सनगर या पोट शाखेत रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. ह्यांचा पारंपरिक व्यवसाय मेंढीच्या लोकरीपासून घोंगडी विणणे. प्रामुख्याने पूर्वी हा व्यवसाय कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात चालत असे. आजमितीस हा घोंगडी हातमाग व्यवसाय शिल्लक राहिला नसून हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक हा व्यवसाय करतात. व्यवसाय करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. घटलेली मागणी आणि कष्टाचा मोबदला मिळत नसल्याने व्यवसाय ठप्प. महाराष्ट्रात प्रामुख्याने सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, बीड, अहिल्यानगर, मुंबई, पिंपरी चिंचवड ह्याठिकाणी वास्तव्य.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →