सडक हा १९९१ चा महेश भट्ट दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात संजय दत्त आणि पूजा भट्ट यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १९९१ सालच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. हा १९७६ च्या अमेरिकन चित्रपट टॅक्सी ड्रायव्हरचा अनधिकृत रिमेक आहे. या चित्रपटाचे तामिळमध्ये अप्पू (२०००) नावाने पुनर्निर्मिती करण्यात आली. २८ ऑगस्ट २०२० रोजी डिस्ने+ हॉटस्टारवर सडक २ हा सिक्वेल प्रदर्शित झाला, जो त्याच्या उदासीन आणि क्लिष्ट कथानकामुळे बॉलिवूडमध्ये चांगला व्यवसाय करू शकला नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सडक (चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.