क्रिमिनल हा १९९४ चा महेश भट्ट दिग्दर्शित भारतीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ह्यामध्ये नागार्जुन, रम्या कृष्णन आणि मनीषा कोइराला यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये एकाच वेळी चित्रित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती के.एस. रामा राव यांनी तेलुगूमध्ये क्रिएटिव्ह कमर्शियल्स बॅनरखाली केली होती आणि हिंदीमध्ये मुकेश भट्ट यांनी विशेष फिल्म्स बॅनरखाली केली होती. एम.एम. कीरावनी (एम.एम. क्रीम) यांनी संगीत दिले होते. क्रिमिनल हा चित्रपट १९९३ च्या अमेरिकन चित्रपट द फ्युजिटिव्ह पासून प्रेरित होता.
तेलुगू आवृत्ती १४ ऑक्टोबर १९९४ रोजी प्रदर्शित झाली, तर हिंदी आवृत्ती २१ जुलै १९९५ रोजी प्रदर्शित झाली. क्रिमिनल हा हिंदी चित्रपट अभिनेते अजित खान यांचा शेवटचा चित्रपट होता. तेलुगू आवृत्ती व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाली नाही.
क्रिमिनल (१९९४ चित्रपट)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.