सईबाई भोसले (२९ ऑक्टोबर १६३३ – ५ सप्टेंबर १६५९) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या.
सईबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील मुधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत.तर त्यांच्या आईचे नाव राणी रेऊबाई निंबाळकर असे होते, रेऊबाई ह्या जिंती येथील चालुक्य वंशी रणनवरे घराण्यातील होत्या. सईबाई यांना तलवार बाजीची आवड होती. सईबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला. त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय ११ वर्षे तर सईबाईंचे वय ७ वर्षे होते. त्या शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या. त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी १४ मे १६५७ रोजी संभाजी महाराजांना जन्म दिला. त्यानंतर सईबाईंची तब्येत बाळांतव्याधी मुळे खालावली. संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना ५ सप्टेंबर १६५९ रोजी महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला.
सईबाई भोसले
या विषयावर तज्ञ बना.