पुतळाबाई भोसले

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पुतळाबाई भोसले

पुतळाबाई भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. पुतळाबाईंचा १५ एप्रिल १६५३ रोजी शिवाजी राजांंशी विवाह झाला. पुतळाबाई पालकर घराण्यातील होत्या. नेताजी पालकर हे पुतळाबाईंचे चुलते होते. त्यांना मूल बाळ नव्हते.

काही सोसियल मीडिया वर असा दावा करण्यात येत आहे की पुतळाबाई सती गेल्या होत्या पण “पुतळाबाई सती गेल्या” हा दावा ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध नाही. कोणत्याही प्राथमिक किंवा समकालीन स्रोतांत हा उल्लेख नाही. जदुनाथ सरकार, G.S. Sardesai, राजवाडे व इतर प्रमुख इतिहासकारांच्या ग्रंथांमध्येही पुतळाबाईंच्या सती जाण्याचा उल्लेख नाही. हा दावा काही उशीरा लिहिलेल्या लोकबखरीत आढळतो, ज्यांची ऐतिहासिक विश्वसनीयता संशयास्पद मानली जाते. त्यामुळे पुतळाबाई सती गेल्या हा प्रकार ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित नाही.”

(संदर्भ: जदुनाथ सरकार — शिवाजी अँड हिज टाइम्स)



महाराजांच्यानंतर स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांनी मोठे योगदान दिले. महाराजांच्या इच्छेप्रमाणे संभाजी राजांकडे त्यांनी स्वराज्याचा कारभार सुखरूप सोपवला. त्यांचा मृत्यू रायगडावर झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →