राजसबाई भोसले

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

राजसबाई भोसले

महाराणी राजसबाई ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी होत्या. त्या कागलकर घाटगे घराण्यातील होत्या. राजाराम महाराजांशी यांचा विवाह छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावर लावून दिला. छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी राजसबाई यांच्या पोटी इ.स. १६९८ साली छत्रपती संभाजी द्वितीय यांचा जन्म झाला.

पुढे इ.स. १७०० मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू झाला. महाराणी ताराबाई यांनी त्यांचा पुत्र शिवाजी द्वितीय याला छत्रपती घोषित केले. इ.स. १७०७ साली छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्रात आल्यावर मराठा साम्राज्याचे विभाजन झाले. सातारा गादीवर शाहूराजे तर कोल्हापूर गादीवर शिवाजी द्वितीय यांचा राज्याभिषेक झाला. इ.स. १७१४ साली राजसबाईंनी बंड केले व कारभाऱ्यांच्या मदतीने ताराराणी व ताराबाई पुत्र शिवाजी द्वितीय यांस कैद केले आणि आपला पुत्र संभाजी द्वितीय यांस कोल्हापूरच्या गादीवर बसवले. राजसबाईंनी छत्रपती संभाजी द्वितीय यांच्या कारकिर्दीत राजमाता म्हणून राज्य केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →