संहिता (चित्रपट)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

संहिता: द स्क्रिप्ट (किंवा फक्त संहिता) हा २०१३ मधील भारतीय मराठी चित्रपट आहे जो सुमित्रा भावे-सुनील सुकथणकर या जोडीने दिग्दर्शित केला होता आणि अशोक अशोक मूव्हीजच्या सहकार्याने मुक्ता आर्ट्स निर्मित आहे. या चित्रपटात देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण आणि राजेश्वरी सचदेव यांच्या मुख्य भूमिका असून उत्तरा बावकर आणि ज्योती सुभाष यांनी सहाय्क भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचे नाट्यप्रदर्शन १८ ऑक्टोबर २०१३ रोजी झाले आणि ६०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात दोन पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले. आरती अंकलीकर-टिकेकर यांवा सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिका आणि शैलेंद्र बर्वे यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (गाणी) हे पुरस्कार मिळाले. दिग्दर्शक-निर्माता सुभाष घई, मुक्ता आर्ट्सचे संस्थापक, हे सुरुवातीला चित्रपटात नव्हते. पण जेव्हा दिग्दर्शक जोडीला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →