देवराई (इंग्रजी: सेक्रेड ग्रोव्ह) २००४ मधील भारतीय मराठी चित्रपट असून दिग्दर्शक सुमित्रा भावे-सुनील सुकथणकर दिग्दर्शित आणि शिझोफ्रेनिया अवेयरनेस असोसिएशन आणि के. एस. वानी मेमोरियल ट्रस्ट निर्मित आहेत. या चित्रपटात अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, देविका दफ्तरदार, तुषार दळवी, आणि मोहन आगाशे प्रमुख भूमिका बजावतात. हा ११ मार्च २००४ रोजी प्रदर्शित केले होते. चित्रपटाचे संगीत श्रीरंग उमरानी यांचे आहे. ही एका छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया) ग्रस्त माणसाची कथा आहे तो आजारपण आणि त्याच्या असहाय बहिणीच्या निराशेचा सामना करण्यास धडपडत आहे.
या चित्रपटाला छिन्नमनस्कताच्या चित्रणासाठी आणि त्याच्या प्रमुख कलाकारंच्या कामगिरीबद्दल समीक्षकांनी कौतुक केले. ११व्या मराठी स्क्रीन पुरस्कारां मध्ये चार पुरस्कार मिळाले: सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार. केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तांत्रिक उत्कृष्टता पुरस्कार मिळाला. ५२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये पर्यावरण संवर्धन / संरक्षणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. अतुल कुलकर्णी यांना मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्काराने गौरविण्यात आले आणि सोनाली कुलकर्णी यांना ४२व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
देवराई (चित्रपट)
या विषयातील रहस्ये उलगडा.