संध्याकाळच्या कविता (कवितासंग्रह)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

संध्याकाळच्या कविता (कवितासंग्रह)

संध्याकाळच्या कविता हा सुप्रसिद्ध मराठी कवी ग्रेस (माणिक गोडघाटे) यांचा १९६७ मध्ये प्रथम प्रकाशित झालेला काव्यसंग्रह आहे. इन्ग्रिड बर्गमन या अमेरिकी अभिनेत्रीच्या दिशेने कवी ग्रेस यांनी (त्यांच्याच भाषेत) हा काव्यसंग्रह सोडून दिलेला आहे. काव्यसंग्रहाच्या आरंभीच्या पृष्ठांमध्येच तसा स्पष्ट उल्लेख आहे. पाश्चात्य कलाकाराला मराठी साहित्यिकाने अर्पण केलेली ही बहुधा पहिलीच साहित्यकृती असावी. या संग्रहातील 'स्मरणशिल्प' या चौथ्या काव्यगुच्छात 'इन्ग्रिड बर्गमन्‌' या शीर्षकाची एक कविता आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →