राजपुत्र आणि डार्लिंग (कवितासंग्रह)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

राजपुत्र आणि डार्लिंग हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा १९७४ मध्ये प्रथम प्रकाशित झालेला (अमेय प्रकाशन) काव्यसंग्रह आहे. प्रकाशनक्रमानुसार तो 'संध्याकाळच्या कविता'नंतर दुसरा येतो. प्रकाशनक्रमात चंद्रमाधवीचे प्रदेश हा काव्यसंग्रह तिसरा येत असला तरी राजपुत्र आणि डार्लिंगमधील कवितांचा निर्मितिकाल चंद्रमाधवीचे प्रदेशमध्ये आलेल्या कवितांच्या नंतरचा आहे, असे कवी ग्रेस यांनीच राजपुत्र आणि डार्लिंगमध्ये म्हटलेले आहे.

ग्रेस यांचे सर्व ग्रंथ पॉप्युलरच्या पडवीत यावेत यासाठी राजपुत्र आणि डार्लिंगची दुसरी आवृत्ती १९९५ मध्ये पॉप्युलर प्रकाशनाने काढली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →