षोरणूर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

षोरणूर

षोरणूर (मल्याळम: ഷൊര്‍ണൂര്‍) हे भारत देशाच्या केरळ राज्यामधील पलक्कड जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. शोरणूर हे शहर केरळच्या राजधानी तिरुवनंतपुरमच्या ३१० किमी उत्तरेस तर पलक्कडच्या ५० किमी पश्चिमेस भारतपुळा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ४३ हजार होती.

शोरणूर येथे केरळ कलामंडलम ही भारतामधील नामांकित शास्त्रीय नृत्याची शिक्षणसंस्था आहे. शोरणूर हे भारतीय रेल्वेचे केरळमधील सर्वात वर्दळीचे जंक्शन असून येथून कोळिकोड, तृशुर, पालक्काड व निलांबूरकडे मार्ग जातात. कोकण रेल्वेमार्गे केरळ व तमिळनाडूकडे तसेच कोइंबतूरमार्गे केरळकडे जाणाऱ्या सर्व गाड्या शोरणूरमार्गे धावतात. तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस, केरळ एक्सप्रेस इत्यादी येथून जाणाऱ्या काही उल्लेखनीय रेल्वेगाड्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →