बरौनी हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील बेगुसराई जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. बरौनी शहर पाटणाच्या १०० किमी पूर्वेस गंगा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ७१ हजार होती. हिंदीसोबतच येथे मैथिली ही भाषा देखील वापरली जाते.
बरौनी येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा मोठा कारखाना आहे. बरौनी हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे जंक्शन असून दिल्लीहून ईशान्य भारताकडे जाणाऱ्या सर्व गाड्या बरौनीमार्गे धावतात. दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस, वैशाली एक्सप्रेस इत्यादी येथून जाणाऱ्या काही उल्लेखनीय रेल्वेगाड्या आहेत.
बरौनी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.