कोट्टयम (मल्याळम: കോട്ടയം) हे भारत देशाच्या केरळ राज्यामधील कोट्टयम जिल्ह्याचे मुख्यालय व एक प्रमुख शहर आहे. कोट्टयम शहर केरळच्या दक्षिण भागात राजधानी तिरुवनंतपुरमच्या १४७ किमी उत्तरेस तर कोचीच्या ६० किमी आग्नेयेस वसले आहे. २०११ साली कोट्टयमची लोकसंख्या सुमारे ५५ हजार होती ज्यापैकी ३९ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय होते. साक्षरतेच्या बाबतीत कोट्टयमचा केरळमध्ये पहिला तर भारत देशात चौथा क्रमांक लागतो व येथील ९७.१ टक्के लोकसंख्या साक्षर आहे.
कोट्टयम हे दक्षिण रेल्वेचे केरळमधील एक वर्दळीचे स्थानक असून येथून भारताच्या सर्व प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी गाड्या सुटतात. हिमसागर एक्सप्रेस, केरळ एक्सप्रेस इत्यादी येथून जाणाऱ्या काही उल्लेखनीय रेल्वेगाड्या आहेत.
कोट्टायम
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.