श.श्री. पुराणिक

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

श.श्री. पुराणिक

प्रा. शरदचंद्र श्रीधर पुराणिक (जन्म : लोणावळा, इ.स. १९३३; - पुणे, २७ जुलै २०१६) हे एक इतिहास अभ्यासक व साहित्यिक होते.



संस्कृत या विषयात बी.ए. आणि एम.ए. करून पाली-सुधागड येथील ग.बा. वडेर हायस्कूलमध्ये १९६१ मध्ये शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केलेले पुराणिक, पुढे ग.प्र. प्रधान सरांच्या सूचनेनुसार एम.ए. (इंग्रजी) करून वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. चिपळूण, खेड, अलिबाग येथे काही काळ नोकरी करून ते चाळीसगाव येथे स्थिरावले.

पुराणिक हे एक विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जात असत. इंग्रजी विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. इंग्रजी नाटकांतील संवाद, स्वगते ते तोंडपाठ म्हणू शकत.

पुराणिक यांनी प्राध्यापक म्हणून ३३ वर्षे अध्यापनाचे काम केले. वाचनाची आणि लेखनाची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांचे काम संशोधनात्मक असे होते. त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर आठ पुस्तके लिहून तयार आहेत, मात्र ती सर्व अप्रकाशित आहेत.

‘रामदास’ या पुस्तकाला पुणे नगर वाचन मंदिरचा, तर ‘तुळाजी आंग्रे’ या पुस्तकाला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

२०१० साली त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०४व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मृत्युंजय पुरस्कार देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →