श्रुती अरुण ओझा ह्या महाराष्ट्रातील बीड शहरात राहणाऱ्या एक मराठी समाजसेविका आहेत. ओझा यांना विविध प्रकारच्या देशी विदेशी घरगुती आणि शेतीउपयुक्त बीया व कंद जमा करण्याचा छंद आहे. तसेच त्या आपल्याकडे जमा केलेल्या बिया मागेल त्या व्यक्तीला मोफत देत असतात. त्यांच्या आगळ्यावेगळ्या छंदामुळे आणि त्याद्वारे चालणाऱ्या समाजकार्यामुळे त्या 'बीज कन्या' म्हणून ओळखल्या जातात.
ओझा यांनी या बीज बँकेचे नाव एस.व्ही.एस. सीड बँक असे ठेवले आहे. या बीज बँकेमार्फत ओझा यांनी आजपर्यंत दोन हजार पेक्षा जास्त लोकांना टपाल द्वारे विविध प्रकारचे बियाणे मोफत वितरित केले आहे.
श्रुती ओझा
थोडक्यात पण महत्त्वाचे.