श्रीलंकेतील तमिळ संघर्ष तेथील तमिळभाषीय व्यक्तींनी वेगळा देश मागण्यासाठी केलेला उठाव होता. श्रीलंकेतील बहुसंख्य सिंहली आणि अल्पसंख्यांक तमिळ यांच्यात सुरू झालेला हा वांशिक संघर्ष सुमारे ४ दशके चालला. सुरुवातीला सांस्कृतिक फरक असणाऱ्या या लढ्याने नंतर सामाजिक, राजकीय व अखेर सशस्त्र संघर्ष असे रूप घेतले. हा लढा खासकरून लिट्टे (एल.टी.टी.ई.) आणि श्रीलंकेचे सैन्य यातील, त्यातही प्रभाकरन या लिट्टेच्या प्रमुखाभोवतीच जास्त फिरला. अखेरीस प्रभाकरनाच्या मृत्युने हा लढा संपुष्टात आला आहे. श्रीलंकेतील सध्याच्या सरकारने यापुढे तमिळांबाबत दुजाभाव बाळगला जाणार नसल्याचे आश्वासन आंतरराष्ट्रीय समुदायास दिले आहे. जागतिक राजकारणावर या लढ्याचे दूरगामी परिणाम आहेत. लिट्टेने गनिमी काव्याचे व दहशतीचे जे तंत्र वापरले त्यामुळे जागतिक दहशतवादात लिट्टेची दखल सतत घेतली
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीलंकेतील तमिळ संघर्ष
या विषयावर तज्ञ बना.