श्रीलंका

या विषयातील रहस्ये उलगडा.

श्रीलंका

श्रीलंका (सिंहली: ශ්‍රී ලංකා; तमिळ: இலங்கை ;), (जूने नाव - सिलोन / Ceylon), हा हिंद महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, उत्तर व पूर्वेकडे बंगालचा उपसागर तथा दक्षिणेकडे हिंद महासागर आहे. भारत आणि मालदीव हे श्रीलंकेचे शेजारी देश आहेत. श्रीलंका इ.स. १९४८ साली राष्ट्रमंडळाचा सदस्य या नात्याने स्वतंत्र झाला.

पर्यटनाच्या दृष्टीने देखील श्रीलंका या शहराला एक वैशिष्ट्यपूर्ण असे स्थान आहे. विशेष म्हणजे अगदी लहानपणापासूनच मुलांमध्ये रामायण कालीन श्रीलंका म्हणून या शहराचे कुतूहल निर्माण होते. तेच हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने विचार करता अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणे या देशामध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणची मुख्य भाषा म्हणजे सिंहली होय. येथील सर्व नागरिक अगदी स्थानिक लोक, टॅक्सीवाले, दुकानदार, हॉटेलचे कर्मचारी या सर्वांची भाषा सिंहली हीच आहे. हिंदी तसेच काही प्रमाणामध्ये शोरूम, हॉटेल्स मॉल्स या ठिकाणी काही प्रमाणात इंग्रजी ही भाषा बोलली जाते. भारत-श्रीलंका संबंध हे अगदी प्राचीन काळापासून आहे. बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान याचा प्रसार सुरुवातीच्या काळामध्ये अग्नी आशियाई देशातील श्रीलंका या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाला. सम्राट अशोक सारख्या चक्रवर्ती शासकाने या देशामध्ये धर्मप्रसारासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन दिले. श्रीलंका आणि भारत यांचा इतिहास प्राचीन काळापासून एकमेकांशी निगडीत असा आहे. दीपवंश, महावंश व चूलवंश या तीन ग्रंथांमधून बुद्धपूर्व काळ आणि बुद्ध उत्तर काळात भारत आणि श्रीलंकेत होऊन गेलेले, राजवंश त्यांचे परस्पर संबंध आणि घडलेल्या ऐतिहासिक घटनाा यांची माहिती मिळते. या ग्रंथांना 'वंशग्रंथ' असे म्हणले जाते.

श्रीलंकेचे क्षेत्रफळ ६५,६१० चौरस किलोमीटर असून लोकसंख्या २ कोटी ७ लक्ष आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →