श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी विद्यापीठ) हे भारतातील एक महिला विद्यापीठ आहे. याची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. SNDTची स्थापना पुण्यातली असली तरी त्याचे स्थलांतर मुंबईस होऊन तिथेच खऱ्या विस्ताराला सुरुवात झाली. या विद्यापीठाशी संबंधित सगळी महाविद्यालये 'एसएनडीटी कॉलेज' म्हणून ओळखली जाऊ लागली.

डिसेंबर, इ.स. १९१५ साली धोंडो केशव कर्वे यांनी इंडियन सोशल काँग्रेसच्या (भारतीय सामाजिक परिषद) अध्यक्षीय भाषणातून महिला विद्यापीठाची कल्पना सर्वप्रथम मांडली. ३ जून, इ.स. १९१६ रोजी विद्यापीठाची औपचारिक स्थापना झाली. पाच विद्यार्थिनींचा पहिला वर्ग ५ जुलै, इ.स. १९१६ रोजी सुरू होऊन विद्यापीठाच्या कामाला आरंभ झाला. इ.स. १९१६ साली या विद्यापीठाची स्थापना भारतवर्षीय महिला विद्यापीठ (इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी) या नावाने झाली. सर विठ्ठलदास ठाकरसींनी या विद्यापीठाला १५ लाख रुपयांची देणगी दिल्यानंतर विद्यापीठाला त्यांच्या आईचे नाव देण्यात आले. १९२० साली विद्यापीठाचे नाव "श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ" असे झाले.

विद्यापीठातर्फे सुरुवातीला जी.ए. (गृहीतागमा) आणि पी.ए. (प्रदेयागमा) अशा दोन पदव्या दिल्या जात असत. इ.स. १९५१ साली या विद्यापीठाला महाराष्ट्र सरकारची मान्यता मिळाली. इ.स. १९९४च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात एक वेगळे कलम (क्रमांक १०५) केवळ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी आहे. या विद्यापीठास महाराष्ट्रात तसेच इतर कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात महाविद्यालये संलग्नित करता येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →