मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील एक आहे. मद्रास, कलकत्ता आणि मुंबई येथील विद्यापीठांची स्थापना इ.स. १८५७ मध्ये झाली होती. यांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना १८ जुलै, इ.स. १८५७ रोजी झाली.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, कोकण, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात. मुंबई विद्यापीठातून विविध ज्ञानशाखांत पदवीपूर्व, पदवीचे, पदविकांचे आणि पदवी पश्चातचे शिक्षण दिले जाते. या जिल्ह्यातील अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक शिक्षण देणारी बहुतेक खासगी महाविद्यालयेसुद्धा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. मुंबई विद्यापीठातील बहुतांश अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकविले जातात.हे खूप मोठे विद्यापीठ आहे.
मुंबई विद्यापीठाला तथागत गौतम बुद्धाचे नाव देण्यात यावे यासाठी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जगताप या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत.
मुंबई विद्यापीठ
यामागील विज्ञान आणि इतिहास.