श्रीगौरी सावंत किंवा गौरी सावंत (२ जुलै, १९७९ - हयात) या मुंबई येथे राहणाऱ्या भारतीय ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या आहेत. सावंत या 'सखी चार चौघी' च्या संचालिका आहेत. ही संस्था ट्रा्सजेंडर लोकांना आणि एचआयव्ही/एड्स ग्रस्त लोकांना मदत करते. सावंत यांनी विक्सच्या जाहिरातीत देखील काम केले आहे. त्यांना २०१९ साली महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाची सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीगौरी सावंत
या विषयातील रहस्ये उलगडा.