गौरी लंकेश

या विषयातील रहस्ये उलगडा.

गौरी लंकेश

गौरी लंकेश (२९ जानेवारी, १९६२ - ५ सप्टेंबर, २०१७:बंगळूर, कर्नाटक, भारत) ह्या बंगळूरच्या पत्रकार व कार्यकर्त्या होत्या. त्यांनी लंकेश पत्रिकें ह्या साप्ताहिकामध्ये संपादक म्हणून काम केले, जे त्यांचे वडील पी. लंकेश यांनी सुरू केले होते. त्यानंतर त्या गौरी लंकेश पत्रिके ह्या नावाने स्वतःचे साप्ताहिक चालवले.

५ सप्टेंबर २०१७ रोजी अज्ञात मारेकऱ्यांनी राजराजेश्वर नगरातील त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून त्यांची हत्या केली. मृत्यूपूर्व काळात त्यांनी हिंदू जहालमतवादी लोकांवर टीका केली होती. त्या आधीही गौरी लंकेश यांनी हिंदुत्ववादी आणि जातीयवादी विचारांच्या संघटनाच्या विरुद्ध अनेक प्रकारे लिखाण करून आवाज उठवला होता. त्यामुळे रामचंद्र गुहांसारख्या अनेक राजकीय विश्लेषकांनी गौरी लंकेश यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारणीभूत असल्याचे प्रतिपादन केले. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असल्याचे कर्नाटक पोलिसांनी सांगितले, परंतु पुराव्याअभावी काहीही कारवाई करता येणार नसल्याचा उल्लेख त्यांनी केला.

गौरी लंकेश यांच्याकडे राज्यकारणातील उजव्या विचारसरणीचा विरोध करणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून पाहिले जाते. उदाहरणार्थ, त्यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीला अनेक पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ देशभरातील संशयास्पद अटकांच्या पार्श्वभूमीवर #IfWeDoNotRise मोहिमेत भाग घेतला.



2021 मध्ये, बर्नाबी या कॅनडातील एका शहराने ५ सप्टेंबर या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त "गौरी लंकेश दिन" म्हणून त्यांच्या स्मरणार्थ साजरा करण्याचा निर्णय घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →