श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक

श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील कटरा येथील रेल्वे स्थानक आहे. उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ह्या स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ४ जुलै २०१४ रोजी केले. जम्मूला श्रीनगरसोबत जोडणाऱ्या मार्गावरील कटरा हे एक स्थानक आहे. आजच्या घडीला सर्व गाड्या कटरापर्यंतच धावतात. ह्या स्थानकामुळे वैष्णोदेवी ह्या तीर्थस्थळी प्रवास करणाऱ्या भाविकांना रेल्वे प्रवास शक्य झाला आहे.

कटरा स्थानक चालू झाल्यानंतर पूर्वी जम्मू तावी रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या अनेक गाड्या कटरापर्यंत वाढवण्यात आल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →