नवी दिल्ली रेल्वे स्थानक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

नवी दिल्ली रेल्वे स्थानक

नवी दिल्ली रेल्वे स्थानक हे भारताच्या दिल्ली शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. १६ फलाट असलेल्या ह्या स्थानकामधून दररोज सुमारे ३०० गाड्या सुटतात ज्यांमधून अंदाजे ५ लाख प्रवासी प्रवास करतात. हे भारतामधील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्रातील दिल्ली विभागाचे मुख्यालय येथेच आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानक दिल्ली मेट्रोच्या पिवळ्या मार्गिकेवर आहे ज्यामुळे येथे पोचण्यासाठी मेट्रोचा वापर शक्य होतो. तसेच दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्सप्रेस ही मार्गिका नवी दिल्ली स्थानकाला थेट इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत जोडते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →