हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक हे भारताच्या दिल्ली शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. ७ फलाट असलेल्या ह्या स्थानकामधून दररोज अनेक गाड्या सुटतात. नवी दिल्ली ह्या प्रमुख स्थानकावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी हे स्थानक बांधले गेले. हजरत निजामुद्दीन स्थानक भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येते.
ह्या स्थानकामधून भारतामधील अनेक महत्त्वाच्या गाड्या सुटतात.
अनेक राजधानी एक्सप्रेस
अनेक शताब्दी एक्सप्रेस
अनेक दुरांतो एक्सप्रेस
अनेक संपर्क क्रांती एक्सप्रेस
गरीब रथ एक्सप्रेस
गोवा एक्सप्रेस
दक्षिण एक्सप्रेस
हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक
या विषयातील रहस्ये उलगडा.