कटरा (जम्मू आणि काश्मीर)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कटरा (जम्मू आणि काश्मीर)

कटरा हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या रियासी जिल्ह्यामधील एक लहान गाव आहे. कटरा जम्मू आणि काश्मीरच्या नैऋत्य भागात जम्मूच्या ४६ किमी उत्तरेस हिमालय पर्वतरांगेच्या पायथ्याशी जवळ वसले आहे. हिंदू धर्मामधील पवित्र वैष्णोदेवी मंदिर कटरापासून ४६ किमी अंतरावर आहे व तेथे जाण्यासाठी कटरामधून प्रवास करावा लागतो.

कटरा हे काश्मीर रेल्वेवरील एक रेल्वे स्थानक आहे. जुलै २०१४ पूर्वी दक्षिणेकडून येणाऱ्या सर्व गाड्यांचे मार्ग जम्मू तावी रेल्वे स्थानकवर संपत असत. २०१४ पासून अनेक गाड्या कटरापर्यंत धावतात ज्यामुळे वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांना रेल्वेप्रवास शक्य झाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →