हिमसागर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक आठवड्यातून एक दिवस धावणारी आगगाडी आहे. ही रेल्वेगाडी भारताच्या तामिळनाडू राज्याच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी पासून उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर राज्याच्या वैष्णोदेवी जवळील कटरा शहरापर्यंत धावते. सध्याच्या घडीला हिमसागर एक्सप्रेस प्रवासवेळ व अंतर ह्या दोन्ही बाबतीत भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची गाडी आहे (कन्याकुमारी-दिब्रुगढ विवेक एक्सप्रेस खालोखाल). हिमसागर एक्सप्रेस कन्याकुमारी ते कटरा दरम्यानचे ३७८७ किमी अंतर ७३ तास व १० मिनिटांमध्ये पूर्ण करते. ह्या प्रवासादरम्यान हिमसागर एक्सप्रेस भारताच्या १२ राज्यांमधून धावते व एकूण ६९ थांबे घेते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिमसागर एक्सप्रेस
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.