श्टेचिन (पोलिश: Szczecin ; जर्मन: Stettin ; काशुबियन: Sztetëno) ही पोलंड देशामधील झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांताची राजधानी; पोलंडमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर व बाल्टिक समुद्रावरील पोलंडचे सर्वात मोठे बंदर आहे. श्टेचिन शहर पोलंडच्या वायव्य भागात जर्मनी देशाच्या सीमेजवळ ओडर नदीच्या काठावर वसले असून ते बर्लिन शहराच्या १५० किमी ईशान्येस स्थित आहे.
आठव्या शतकात वसवले गेलेले श्टेचिन शहर प्रशिया, जर्मन साम्राज्य व नाझी जर्मनीमधील एक प्रमुख बंदर होते. इ.स. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धानंतर श्टेचिनमधील सर्व जर्मन रहिवाशांना हाकलून लावण्यात आले व पोलंडच्या अखत्यारीत आणण्यात आले.
श्टेचिन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.