कालिनिनग्राद

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कालिनिनग्राद

कालिनिनग्राद (रशियन: Калининград; जुने नाव: क्योनिग्जबर्ग, जर्मन: Königsberg; रशियन: Кёнигсберг; लिथुएनियन: Karaliaučius; पोलिश: Królewiec) हे रशिया देशाच्या कालिनिनग्राद ओब्लास्ताचे मुख्यालय व बाल्टिक समुद्रावरील एक मोठे बंदर आहे. कालिनिनग्राद ओब्लास्त हे पोलंड व लिथुएनिया ह्यांच्या दरम्यान वसलेले रशियाचे एकमेव बहिःक्षेत्र आहे जे संलग्न रशियन भूभागापासून वेगळे आहे.

इ.स. १२५५ साली क्रुसेड दरम्यान सध्याच्या कालिनिनग्राद भागामध्ये एक मोठा किल्ला बांधला गेला व ह्या शहराचे नाव क्योनिग्जबर्ग असे ठेवण्यात आले. त्यानंतरच्या काळात ह्या शहरावर पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल, रशियन साम्राज्य, प्रशिया, जर्मनी इत्यादी महासत्तांचे अधिपत्य होते. जर्मन साम्राज्य व नाझी जर्मनीच्या कार्यकाळात हे शहर पूर्व प्रशिया प्रांतामध्ये होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान क्योनिग्जबर्गची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. १९४५ साली सोव्हिएत लाल सैन्याने ह्या भूभागावर ताबा मिळवला व युद्ध संपल्यानंतर तो सोव्हिएतमध्ये सामील केला गेला. १९४६ साली ह्या शहराचे नाव बदलून कालिनिनग्राद असे ठेवण्यात आले.

२०१८ फिफा विश्वचषकाच्या ११ यजमान शहरांपैकी कालिनिनग्राद एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →