कालिनिनग्राद ओब्लास्त

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कालिनिनग्राद ओब्लास्त

कालिनिनग्राद ओब्लास्त (रशियन: Калининградская область, कालिनिंग्राद्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील सर्वांत पश्चिमेकडील ओब्लास्त आहे. हा रशियाचा एकमेव भूभाग आहे जो एकसंध रशियापासून वेगळा आहे. कालिनिनग्राद ओब्लास्त बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसले असून त्याच्या भोवताली लिथुएनिया व पोलंड हे देश आहेत.

कालिनिनग्राद हे कालिनिनग्राद ओब्लास्ताचे राजधानीचे व सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर पूर्वी क्यॉनिग्सबेर्ग या नावाने ओळखले जात असे. पूर्वी ते ऐतिहासिक प्रशियामधील महत्त्वाचे शहर होते. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धापर्यंत ते जर्मनीच्या पूर्व प्रशिया प्रांतात गणले जात असे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात कालिनिनग्राद ओब्लास्ताच्या परिसराची सोव्हिएत संघ व पोलंड यांदरम्यान वाटणी झाली. सोव्हिएत संघात सामावलेल्या या भूभागास सोव्हिएत अध्यक्ष मिखाइल कालिनिन याच्या नावावरून नवीन नाव देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →