डॉ. शुभा साठे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी सावरकर बंधूंच्या पत्नी यशोदा गणेश सावरकर (बाई), यमुना विनायक सावरकर (माई) आणि शांता नारायण सावरकर (ताई) या तिघीच्या जीवनावर त्या तिघी नावाची कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीला पुणे मराठी ग्रंथालयाकडून २०१७ सालचा ह.ना. आपटे पुरस्कार मिळाला आहे.
डाॅ. साठे या मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए,पीएच्.डी. झाल्या असून त्या बी.एड.ही आहेत. नागपूरच्या एल.ए.डी. काॅलेजात त्या प्राध्यापक आहेत. बी.ए,च्या परीक्षेत त्यांना पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाले होते. पी.एच्डी. साठी त्यांनी 'स्वातंत्रवीर सावरकर आणि
पु,भा. भावे यांच्या वाङ्मयाचा तुलनात्मक, चिकित्सक अभ्यास' ह्या नावाचा प्रबंध लिहिला होता.
शुभा साठे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?