जयवंत दत्तात्रेय जोगळेकर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ज.द. जोगळेकर (जन्म : चिखलवाडी-मुंबई, ७ ऑक्टोबर १९२१; - मुंबई, १५ जुलै, इ.स. २०१६) हे एक सावरकरप्रेमी पत्रकार होते. ते कायद्याचे पदवीधर होते. मूळचे बडोद्याचे असलेले जोगळेकर मुंबईत काही काळ ’द बॉंम्बे क्रॉनिकल’ या वृत्तपत्रात उपसंपादक होते. नंतर ते मुंबई महानगरपालिकेच्या ’बेस्ट’ उपक्रमात संपर्क अधिकारी झाले. पत्रकार दि.वि. गोखले आणि ज.द.जोगळेकर यांची खास मैत्री होती. सावरकरांच्या निधनानंतर निघालेल्या ’विवेक’च्या सावरकर पुरवणीत दोघांचेही लेख होते. दोघेही युद्धशास्त्राचे अभ्यासक होते.

१९६५ च्या चीन-भारत युद्धानंतर जोगळेकर यांनी ’नवशक्ति’च्या रविवारच्या अंकांतून ’युद्धतंत्राची उपेक्षा’ ही लेखमाला लिहिली. तिचेच पर्यवसान त्यांच्या ’भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा’ या ग्रंथात झाले. त्याला ना.ग. गोरे यांची प्रस्तावना होती. हा ग्रंथ अतिशय गाजला; इतका की, ग्रंथातील सिद्धान्ताला महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृती कोशात स्थान मिळाले.

ज.द. जोगळेकर हे हिंदुत्वाचे खंदे भाष्यकार आहेत. त्यांचे ’एका हिंदुत्वनिष्ठाची आत्मकथा’ नावाचे आत्मचरित्र त्यांच्या वयाच्या ९२व्या वर्षी प्रकाशित झाले.

जयवंतराव जोगळेकरांच्या डॉक्टर पत्‍नीचे नाव शोभा होते आणि मुलाचे विजय. जोगळेकरांनी आपल्या पत्‍नीवर एक व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक लिहिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →