"अग्रलेखांचा बादशहा" म्हणून ओळखले जाणारे नीळकंठ (ऊर्फ निळूभाऊ) खाडिलकर (जन्म : ६ एप्रिल १९३४, मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१९) हे दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे जवळपास २७ वर्षे संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होत. ते संध्याकाळ या नावाचे सायंदैनिकही काढीत असत. निळूभाऊ खाडिलकरांचे "हिंदुत्व" हे पुस्तक समीक्षकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.
खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या.
नीळकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांना इतिहाससाक्षर केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहचविले. ‘अग्रलेखांचा बादशहा’ ही नीळकंठ खाडिलकर यांची मराठी वाचकांमध्ये ओळख आहे. त्यांच्या झंझावाती, मार्मिक आणि सामान्य वाचकालाही कळेल अशा सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला. खाडिलकर यांच्या ग्रंथवाचन व्यासंगाचा अनेक विद्वानांनी गौरव केला आहे. तळागाळातील लोकांसाठी नीळकंठ खाडिलकरांनी आपली लेखणी वापरली.
खाडिलकरांच्या अग्रलेखांचे ५हून अधिक संग्रह प्रकाशित झाले आहेत.
नीळकंठ खाडिलकर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.