भालचंद्र दत्तात्रय खेर (जन्म : कर्जत-अहमदनगर जिल्हा, जून १२, इ.स. १९१७ - - पुणे; जून २१,इ.स. २०१२) हे मराठी लेखक होते. बी.ए. एल्एल.बी. झालेले भा. द. खेर हे पंचवीस वर्षे केसरीचे उपसंपादक होते. तत्पूर्वी त्यांनी अग्रणी, हिंदुराष्ट्र, भारत आदी दैनिकांत काम केले होते. वसंतराव काणे यांच्या "रोहिणी' मासिकाचे संपादनकार्य काही काळ त्यांनी केले. तसेच 'सह्याद्री' मासिकाचे ते दहा वर्षे संपादक होते. भा.द. खेर हे मराठी लेखक वि.स.खांडेकर यांचे मामेभाऊ लागत.
खेर स्वतःला प्राध्यापक श्री.म. माटे यांचे शिष्य म्हणवून घेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरत असताना सामाजिक कार्यातही ते तेवढ्यात आत्मीयतेने सहभागी होत. "केसरी' गणेशोत्सवातील दहा दिवसांचे सांस्कृतिक कार्यक्रम लोकप्रिय करण्यात खेर यांचा मोठा वाटा असे. जयंतराव टिळक, वि.स. माडीवाले, हरिभाऊ कुलकर्णी, रामभाऊ जोशी आदींच्या "केसरी'च्या आवारात जमणाऱ्या मैफिलीतील गप्पा, हास्यविनोद आणि एकमेकांची थट्टा हा एक अविस्मरणीय अनुभव होता. स.मा. गर्गे यांनी संपादित केलेल्या "यशवंतराव चव्हाण आणि पत्रकार' या पत्रसंवाद ग्रंथांतील भा.द. खेर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील पत्रव्यवहार वाचल्यानंतर खेरांच्या ’लेखनध्यास' किती होता हे ध्यानात येते. केवळ लेखन विषयाशी निगडित असलेले मनस्वी पत्रकार असूनही त्यांना नवनवीन साहित्यनिर्मितीचा अखंड ध्यास असणे, हेच खेरांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.
भालचंद्र दत्तात्रय खेर
या विषयातील रहस्ये उलगडा.