धर्मवीर लक्ष्मण बळवंत भोपटकर, ऊर्फ अण्णासाहेब भोपटकर (१० मे, इ.स. १८८० - २४ एप्रिल, इ.स. १९६०; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी पत्रकार, हिंदुत्ववादी राजकारणी व वकील होते. हे केसरी वृत्तपत्राचे संपादक होते. तसेच हे महाराष्ट्र मंडळ शिक्षणसंस्थेचे संस्थापक व हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते. ल.ब. भोपटकर हे व्यायामशास्त्रतज्ज्ञ होते. त्यांनी व्यायाम आणि व्यायामप्रकार यांच्यावर काही पुस्तके लिहिली आहेत. ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वकील होते. गांधी खून खटल्यातील सर्व आरोपींचे खटले भोपटकरांनी एक पैसाही न घेता चालवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लक्ष्मण बळवंत भोपटकर
यामागील विज्ञान आणि इतिहास.