शीला बालकृष्णन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

डॉ. शीला बालकृष्णन या एक प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्रावर तीन पुस्तके लिहिली आहेत. त्या सध्या त्रिवेंद्रम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागातील सहयोगी प्राध्यापिका आहेत. त्यांनी त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेजमधून एमडी आणि डीएनबीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टमध्ये १९९४ मध्ये सदस्यत्व देण्यात आले. त्यानंतर २००८ मध्ये फेलोशिप बहाल करण्यात आली. त्यांना युनायटेड किंगडममध्ये कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती पुरस्कार मिळाला आहे. त्या फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (एफओजीएसआय) आणि इंडियन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रीशियन अँड गायनॅकोलॉजिस्टच्या सदस्या आहेत. सध्या त्या एफओजीएसआय च्या गर्भनिरोधक आणि वैद्यकीय विकार समितीची सदस्या आहेत.नोव्हेंबर २०१३ मध्ये, डॉ. शीला बालकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दक्षिण भारतातील पहिल्या इन विट्रो फर्टिलायझेशन बाळांच्या जन्माची घोषणा केली. त्यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांमध्ये प्रसूतीशास्त्राचे पाठ्यपुस्तक, स्त्रीरोगाचे पाठ्यपुस्तक आणि प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्रातील क्लिनिकल केस डिस्कशन यांचा समावेश आहे. याच बरोबर त्यांनी असंख्य शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →