शिवाजीनगर (पुणे) एस.टी. बसस्थानक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शिवाजीनगर बसस्थानक महाराष्ट्राच्या पुणे शहरातील मोठे बस स्थानक आहे. हे स्थानक शिवाजीनगर रेल्वे स्थानक आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे शिवाजीनगर बसस्थानक यांच्या लगतच आहे.

हे स्थानक पुण्याला महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील मोठ्या शहरांशी बससेवेने जोडते. येथून महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, नासिक, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, अहमदनगर, सातारा, सोलापूर, शिर्डी, धुळे, अकोला, मनमाड सारख्या शहरांना थेट बससेवा आहे. याशिवाय येथून गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा आणि आंध्र प्रदेश राज्यांतील अनेक शहरांपर्यंत बससेवा उपलब्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →