शिवाजी शत्तुप्पा पाटील (१९६९ - ) हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकीत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर अपक्ष निवडून गेले.
पाटील यांनी बारावी इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर शिक्षण सोडले. पुढे २००९ मध्ये नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मधील बीए पदवी सुद्धा त्यांनी शिक्षण अर्धवट सोडली. ते त्यांच्या पत्नीसह स्वतःचा बांधकाम आणि वाहतूक व्यवसाय चालवतात.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला. त्यांना ८४,२५४ मते मिळाली आणि त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश नरसिंगराव पाटील यांचा २४,१३४ मतांनी पराभव केला. विजयाच्या जल्लोषा दरम्यान लागलेल्या आगीत त्यांचे काही अनुयायी जखमी झाले.
शिवाजी पाटील
या विषयातील रहस्ये उलगडा.